आमच्या सेवा,
ऑलीफाँट सोल्युशन्समध्ये, आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनद्वारे आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक सेवा ऑफर करतो. आमच्या सेवा आरोग्य सेवा संस्थांच्या विविध गरजा पूर्ण करतात.
आमच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवांचे प्रकार
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असेसमेंट
- सध्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन करणे.
- अंतर्गत प्रक्रिया जाणून घेताना संस्थेच्या प्रमुखापासुन ते रुग्णांपर्यंत, सर्वसमावेशक सर्व भागधारकांचे मत विचारात घेतले जाते.
- आम्ही तयार केलेल्या खास स्कोअरकार्ड प्रक्रियेचा वापर करून, एखाद्या हॉस्पिटल ला पुढच्या ३ वर्ष्याच्या दृटीने जो विचार केला आहे त्यासाठी त्यांचे मूल्यांकन करतो.
- आमचा अहवाल आणि सूचना उपदेश डिजिटलायझेशन इच्छित स्तरावर पोहोचवण्यासाठी भविष्यातील कृतिकार्यक्रम योजना आखण्यात मदत करतात.
सॉफ्टवेअर निवड, अंमलबजावणी आणि उपयोग
ऑलीफाँट सोल्युशन्स चे स्वतःचे सॉफ्टवेअर नाही.
सॉफ्टवेअरची निवड :
- आम्ही ग्राहकांच्या गरजा समजतो, आमचे पॅन इंडिया सॉफ्टवेअर पार्टनर नेटवर्क असल्याने आम्हाला अचूक लागणाऱ्या सॉफ्टवेअर ची आणि क्लायंट ला काय लागणार आहे याची जुळणी करण सोप्पं जातं.
- सॉफ्टवेअरचे सतत मूल्यमापन (कार्यात्मक, तांत्रिक) करून, आम्ही आमच्या क्लायंटला त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार योग्य पर्याय देतो आणि त्यांना त्यांच्या बजेटनुसार सर्वोत्तम निवडण्यात मदत करतो.
अंमलबजावणी:
- क्लायंटद्वारे योग्य सॉफ्टवेअर निवडल्यानंतर, बहुतेक वेळा अंमलबजावणी ही एक मोठी समस्या असते, आम्ही आमच्या क्लायंटला अचूक SOPs सॉफ्टवेअरमध्ये एकत्रित करण्यासाठी मदत करतो.
सॉफ्टवेअरचा योग्य उपयोग:
- डिजिटलायझेशन मध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेट-अपमध्ये सॉफ्टवेअरचा वापर योग्य प्रकारे होणे बहुतेक वेळा त्याकडे लक्ष दिले जात नाहीत.
- आम्ही रुग्णालयांना त्यांच्या सॉफ्टवेअरचा वापर सुधारण्यास मदत करतो आणि बहुगुणित परिणाम देतो- ज्यामध्ये
- सॉफ्टवेअर चा सध्याचा वापर आणि कमी वापराची कारणे समजून घेणे.
- कुठलीही कार्यपद्धती योग्य चालण्याचा दृष्टीने त्याचा सखोल अभ्यास , नक्की कुठे अडथळे आहेत ,अकार्यक्षमता आहे हे समजून घेतलं जात
- उपयोगी माहिती उपलब्ध होण्याचा दृटीने SOP (Standard operating Procedure) चा वापर करणे
- अडचणी सोडवण्यासाठी रुग्णालयातील सॉफ्टवेअर विक्रेत्यांसह, टीम सदस्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे.
- कालांतराने कोणतेही अडथळे टाळण्यासाठी आणि पुढील फायदे मिळविण्याचे मार्ग शोधण्यासाठी, वेळेवर पुनरावलोकन (Review) करणे.
डेटा मूल्यांकन आणि विश्लेषण
- डेटाचे किती प्रमाणात आहे , केवढा आहे , गुणवत्ता कशी आहे आणि कश्या पद्धतीने आहे , हे लक्षात घेऊन डेटाचे मूल्यांकन.
- उपयुक्त डेटासाठी कुठे अडचणी आहेत ते शोधणे आणि तो योग्य पद्धतीने उपयोगाला येण्यासाठी काय करावे लागेल याविषयी हॉस्पिटल ना मदत करणे (डेटा कॅप्चरिंग आणि डेटा वापर).
- चांगला अहवाल (Report) आणि डॅशबोर्ड मिळवण्यासाठी लागणारं मार्गदर्शन.
अनुपालन मूल्यांकन आणि मार्गदर्शन
- नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स (NABH) आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अनुपालनाचा दृष्टीने सध्याचा सॉफ्टवेअर चे परीक्षण करणे यासाठी आम्ही हॉस्पिटल्स ना मदत करतो .याचा ऑडिट साठी लागणारे रिपोर्टस सॉफ्टवेअर द्वारे सहज कसे मिळतील यासाठी चे मार्गदर्शन देतो. यामध्ये गोपनीयता आणि माहिती सुरक्षा, तक्रार व्यवस्थापन प्रक्रिया, माहिती प्रणाली प्रवेश, डेटा शेअरिंग याचा विचार केला जातो.
डिजिटल (सोशल) मीडिया व्यवस्थापन
आजच्या जगात हेल्थकेअर संस्थेची डिजिटल उपस्थिती तसेच सोशल मीडियावरील सहभाग हा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तथापि, एक संस्था म्हणून डिजिटल होत असलेल्या डेटाची गुणवत्ता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ऑलीफाँट सोल्यूशन्स हेल्थकेअर संस्थेची ऑनलाइन उपस्थिती आणि पोहोच मजबूत करण्यासाठी खालील सेवा देते:
- धोरण ठरवणे
- योग्य सोशल मीडिया निवड (2 डिजिटल मीडिया)
- अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सेट करणे
- त्यावर येणार डेटा काय आणि कसा असला पाहिजे याविषयी मार्गदर्शन (उदा. आरोग्य जागरूकता, हॉस्पिटल सेवा)
- रचना आणि प्रकाशन
- मासिक अहवाल
आरोग्य सेवा उपायांसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)
आजकाल कोणत्याही हेल्थकेअर सेटअपला नावीन्यपूर्णतेची गरज आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांबरोबर आणि असे प्रॉडक्ट बनवऱ्यांसोबत काम करताना ,आम्ही IoT/AI वापरून व्यवसायाला फायदे कसे होऊ शकतील ,बचत कुठे होऊ शकेल आणि गुंतवणूकीवर परतावा (ROI) कसा मिळेल यासाठी सहकार्य करतो. याबरोबरच:
- बिझनेस केस तयार करणं
- IoT च्या वापरासाठी योजना करणे
- IoT आर्किटेक्चर डिझाइन करणे
- IoT सुरक्षा धोरण तयार करणे
- IoT डेटासह AI (Artificial Intelligence) आणि ML (Machine learning) चा वापर
IoT/AI आहे त्या सिस्टिम मध्ये कसा बसवता येईल आणि सर्वसमावेशक उपाय कसे शोधात येतील यासाठी आम्ही उपाय शोधून काढतो (इंटिग्रेटेड सिस्टिम्स)
विक्रेता/भागीदार (प्रॉडक्ट पार्टनर) यासाठीची सेवा
- बाजारातील मागणीनुसार सॉफ्टवेअर ची क्षमता बघते आणि त्यादृष्टीने मार्गदर्शन करणे.
- ABDM/NABH च्या दृष्टीने सॉफ्टवेअर मधले बदल सुचवणे.
- नवनवीन modules चा समावेश करणे.
- IoT, AI साठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणे.
- सॉफ्टवेअर कंपन्यांना भौगोलिक पोहोच सुधारण्यासाठी सुविधा.
सायबर सुरक्षा आणि व्यवसाय सातत्य मूल्यांकन
- आमच्या खास प्रक्रियेसह, क्लायंटकडे सायबर सुरक्षा कशी लागू केली जाते याचे पुनरावलोकन करणे.
- वापरकर्ते सॉफ्टवेअर आणि विविध प्रक्रिया कसे वापरतात याचे संपूर्ण विश्लेषण.
- अनधिकृत व्यक्तींना रूग्णांची माहिती आणि आर्थिक माहिती मिळवण्यापासून रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान उपायांचे व्यापक पुनरावलोकन करणे. डेटाची अखंडता, गोपनीयता आणि सुरक्षितता नेहमी राखली जाईल याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे.
- डेटा बॅकअप, डेटा पुनर्संचयित करणे आणि आपत्कालीन परिस्तिथी मध्ये डेटाची पुनर्प्राप्ती यंत्रणेचे तपशीलवार विश्लेषण करणे.
- गॅप ओळखणे, रोडमॅप तयार करणे, संपूर्ण अहवाल आणि शिफारसी देणं, जे सुरक्षा उल्लंघन आणि आपत्कालीन परिस्थितींविरूद्ध मजबूत संरक्षण तयार करेल.